अभिप्राय / तक्रार फॉर्म

ठळक बातम्या

प्रेस नोट - सीपीआर, पुणे येथे दिवंगत वसंत केशव सराफ, निवृत पोलीस महसंचालक यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. पोलीस स्‍मृतीदिन - २०२४ थेट प्रसारण विशेष सेवा पदक महिला सुरक्षा हेल्‍पलाइन क्र. ८९७६००४१११, ८६५७२२२७७७, ०२२४५१६१६३५ सिटीझन पोर्टलवरील नागरीकांचे सुविधा यामधील ई-तक्रारी बाबत. पोलीस शिपाई भरती २०२२-२३, माहिती डाइल ११२ सिटीझन पोर्टल एन.आई.सी. ईमेल - Kavach Authentication बाबत मार्गदर्शन देशाच्या सेवेत भारतीय पोलीस

महाराष्ट्र राज्य पोलीस

अधिकृत संकेतस्थळ

ठळक बातम्या

प्रेस नोट - सीपीआर, पुणे येथे दिवंगत वसंत केशव सराफ, निवृत पोलीस महसंचालक यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. पोलीस स्‍मृतीदिन - २०२४ थेट प्रसारण विशेष सेवा पदक महिला सुरक्षा हेल्‍पलाइन क्र. ८९७६००४१११, ८६५७२२२७७७, ०२२४५१६१६३५ सिटीझन पोर्टलवरील नागरीकांचे सुविधा यामधील ई-तक्रारी बाबत. पोलीस शिपाई भरती २०२२-२३, माहिती डाइल ११२ सिटीझन पोर्टल एन.आई.सी. ईमेल - Kavach Authentication बाबत मार्गदर्शन देशाच्या सेवेत भारतीय पोलीस

महिला सुरक्षितता

छेडछाड आणि त्यापलीकडील त्रास

रस्ते, बस स्थानके, रेल्वे स्थानके, उद्याने आणि अन्य सर्व सार्वजनिक स्थळे सर्वांसाठी खुली आहेत. त्यांचा आनंद सर्वजण घेऊ शकतात. मात्र, अनेक स्त्रियांसाठी ही छळाची ठिकाणे ठरतात. स्त्रियांच्या संचाराच्या तसेच व्यक्ती म्हणून प्रतिष्ठेच्या मूलभूत हक्कावर दररोज गदा आणली जात आहे. 

समस्या:

सीमा रस्त्यावरून चालत असते, तेव्हा एक पुरुषांचा समूह तिच्या चेहऱ्यावर व बांध्यावर टिप्पणी करतो.  ‘वा! काय फिगर आहे!’ ‘बत्तीस असेल की छत्तीस?’ सीमा या आगाऊ टिप्पणीकडे दुर्लक्ष करून चालत राहते. टिपण्या अधिक अश्लाघ्य होत जातात. ते तिला 'बिच’ म्हणतात. 

सुधा बससाठी रांगेत उभी आहे. अचानक तिला तिच्या छातीवर हात पडल्यासारखा वाटतो. ती आजूबाजूला बघते पण हे नेमके कोणी केले ते तिला ते कळत नाही. तिला आपल्या खासगी मर्यादेत अतिक्रमण झाल्यासारखे वाटते पण काही बोलण्याची हिंमत तिला होत नाही. 

एक माणूस ऑफिस ते घर या मार्गात आपला पाठलाग करत आहे हे कविताच्या लक्षात येते. तो बऱ्यापैकी अंतरावर असतो आणि अनेक दिवस शांत राहतो. मात्र, एक दिवस तो जवळ येऊन तिला हाक मारतो. ती खूप घाबरते आणि त्याला टाळण्यासाठी तिचा मार्ग तसेच जाण्यायेण्याची वेळ बदलून टाकते. सार्वजनिक स्थळी लैंगिक त्रास दिला जाणे चालवून घेण्याजोगे नाही. टक लावून बघणे, घाणेरडे हावभाव करणे, स्पर्श करणे, कमेंट्स करणे, पाठलाग करणे या सगळ्याचा समावेश  लैंगिकदृष्ट्या अश्लाघ्य वर्तनामध्ये होतो. ही मोठी समस्या नाही असे वाटू शकते पण या बाबी अस्वस्थ करून टाकू शकतात. यामुळे स्त्रियांना शरमल्यासारखे वाटते, अपमानित वाटते, भीती वाटते. 

सार्वजनिक स्थळी होणाऱ्या लैंगिक छळाशी निगडित गैरसमज:

- विशिष्ट कपडे घातल्यामुळे लैंगिक छळाला आमंत्रण मिळते

हा गैरसमज आहे. कोणत्याही वयोगटातील व कोणत्याही प्रकारचे कपडे घातलेल्या स्त्रियांचा छळ होऊ शकते हे जगभरातील अनेकविध अभ्यासांतून पुढे आले आहे. एनआयपीपीसीआयडीने दिल्ली पोलिसांसाठी केलेल्या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या स्त्रियांपैकी ८२ टक्के स्त्रिया अगदी सामान्य, प्रक्षोभक नसलेले कपडे (सलवार-कमीज, ट्राउजर-टॉप, साडी) परिधान करत होत्या, तरीही त्यांना लैंगिक छळाचा सामना करावा लागला होता.

- विशिष्ट वर्गातील लोकच लैंगिक छळात सहभागी असतात

हीदेखील सामान्य धारणा आहे. मात्र, येथे मुद्दा वर्गाचा नाही, तर मानसिकतेचा आहे. स्त्रियांना त्रास देणे सोपे आहे असे वाटणारे लोक स्त्रियांचा लैंगिक छळ करण्यात सहभागी असतात. 

लैंगिक छळाची समस्या कशी हाताळावी?

लैंगिक छळाची समस्या हाताळण्यासाठी एक असा उपाय नाही. प्रत्यक्ष घटनास्थळी आजूबाजूचे संदर्भ विचारात घेऊन निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. 

स्पष्टपणे व मोठ्या आवाजात 'नाही’ म्हणायला शिका. एखादे वाक्य मनात योजून ठेवा (उदाहरणार्थ, 'माझ्याकडे टक लावून बघू नका') आणि ते प्रतिक्षिप्त क्रियेसारखे उमटत नाही, तोवर ते म्हणण्याचा सराव करा. जर तुम्हाला कोणी त्रास देत असेल तर त्या व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी हे वाक्य सुनावण्याचा आत्मविश्वास येईपर्यंत सराव करत राहा. 

आत्मविश्वासाने संवाद साधणे शिका. तुम्हाला त्रास देणाऱ्यांकडे सरळ बघा आणि त्यांच्या वर्तनाला स्पष्टपणे व शांतपणे उत्तर द्या. तुम्हाला तुमच्या हक्कांची व खासगीत्वाच्या अधिकाराची जाणीव आहे हे समोरच्याला दाखवून द्या. 

तुम्ही बसमधून प्रवास करत असाल, तर अशा वर्तनाची तक्रार वाहक किंवा चालकाकडे करू शकता. कायद्यानुसार तक्रार करणाऱ्या स्त्रीबरोबर जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन तिला मदत करू शकता. 

जवळ सेफ्टीपिन्स बाळगणे तसेच स्वयंसंरक्षणाची तंत्रे अंगिकारणे उपयुक्त ठरू शकते. 

तुम्हाला कोणी सातत्याने त्रास देत असेल, तर याची माहिती तुमच्या पालकांना/मित्रमंडळींना दिली पाहिजे. यातून या त्रासावर उपायही निघू शकतो आणि तुम्हाला पाठिंबाही मिळू शकतो. अनेक स्त्रिया या त्रासातून गेलेल्या असतात आणि तुम्हाला काय अनुभव येत आहे हे त्या समजून घेऊ शकतात. 

छळ थांबवण्यासाठी पुरुष काय करू शकतात? 

तुम्ही स्वत: कोणालाही असा त्रास देऊ नका. या समस्येबद्दल जाणून घ्या, जेणेकरून, तुम्ही याबद्दल संवेदनशील व्हाल आणि या त्रासाला तोंड देणाऱ्यांच्या समस्या समजून घेऊ शकाल. 

- स्त्रियांना लैंगिक त्रास देणाऱ्यांना मदत करू नका. लैंगिक छळाला विरोध करा. छळाला प्रोत्साहन देऊ नका. त्यात सहभागी होऊ नका.

- अनुकूल प्रसंग असेल तेव्हा लैंगिक छळाचा मुद्दा उपस्थित करा.

- तुमची मते कणखरपणे मांडा.

- एखाद्या स्त्रीचा छळ केला जात आहे अशी परिस्थिती लक्षात आली, तर तुम्ही तिला मदत करू शकता. कोणी एखाद्या स्त्रीला त्रास देत असेल, तर 'तुम्हाला कोण त्रास देत आहे?’ असा प्रश्न तिला विचारा. जर गर्दीत एखाद्या स्त्रीने छळाची तक्रार केली, तर 'हे कोण करत आहे, असे अजिबात खपवून घेण्याजोगे नाही’ असे गर्दीला उद्देशून जोरात ओरडा.

विवाह

पतीद्वारे फसवणूक होत असल्याची लक्षणे

तुमचा जोडीदार तुम्हाला फसवत आहे की नाही हे जोखण्याचा सामान्यपणे वापरला जाणारा मार्ग म्हणजे त्याच्या दिनक्रमात व वर्तनात काही बदल आहेत का, हे बघणे. तुमच्या जोडीदाराचे प्रेमप्रकरण सुरू असेल तर तो नक्कीच वेगळा वागेल. याचे कारण म्हणजे, आपण सगळे एका ठराविक दिनक्रमात रमलेले असतो आणि आपल्या आयुष्यात काही बदल झाला, तर साहजिकच आपला द्नक्रम बदलतो व आपण गोष्टी वेगळ्या पद्धतीने करू लागतो. तुमच्या पतीच्या दिनक्रमातील बदलांमधून त्याचे कोणासोबत प्रेमप्रकरण सुरू आहे का, याबद्दल धागेदोरे सापडतील. अर्थात हे अनेकदा नजरेतून सुटूही शकते. 

खालीलपैकी काही तुमच्या लक्षात आले आहे का?

- तो तुमच्यावर किंवा मुलांवर पटकन चिडू लागला आहे का?

- पूर्वी तो तुमच्यासोबत आनंदाने घरी थांबत होता पण आता त्याला बाहेर राहणे अधिक आवडू लागले आहे का?

- तो रात्री उशिरापर्यंत जागा राहत आहे का? याचा अर्थ तुम्ही त्याच्या आधी झोपी जाल आणि मग तो 'तिला' फोन किंवा एसएमएस करू शकेल या हिशेबाने तो उशिरापर्यंत जागा राहत असेल.

- त्याचे सेलफोनबाबतचे वर्तन संशयास्पद झाले आहे का? म्हणजे तो त्याच्या सेलफोनबद्दल अधिक पझेसिव झाला आहे का? तुम्ही आसपास असताना तो सेलफोन स्वत:च्या जवळच ठेवतो का? फसवणूक करणारे पुरुष दुसऱ्या स्त्रीशी संपर्क साधण्यासाठी सेलफोनचा वापर करतात. ते अगदीच मूर्ख असतील, तरच घरातील फोननंबरचा वापर करतील. तो कॉल लॉग्ज आणि मेसेजेस सारखे इरेझ करत असतो का, याकडे लक्ष ठेवा.

- तुम्ही आसपास असताना फोन घ्यावा लागला तर तो सांकेतिक भाषेत बोलतो का? तुमच्या उपस्थितीत तो अवघडून जातो का?

- त्याचे पैशाचे पाकीट, पॉकेट कॅलेंडर किंवा ब्रिफकेसबद्दल तो अधिक पझेसिव झाला आहे का?

- तो घरात तुम्हाला टाळू लागला आहे का? तो तुमच्या नजरेला नजर देऊन बोलत नाही का?

- तो अधिक वेळ आणि वारंवार चालण्यासाठी बाहेर जात आहे का?

- वाद सुरू झाल्यानंतर तो हिरीरीने वाद न घालता, पडती भूमिका घेत आहे का? पुरुष जेव्हा फसवत असतात तेव्हा त्यांना वाद घालणे आवडत नाही, वाद टाळण्यासाठी ते काहीही करायला तयार असतात.

- त्याला पूर्वी ज्या गोष्टीबद्दल खूप प्रेम होते, उदाहरणार्थ एखादा खेळ किंवा छंद, त्या गोष्टीतील त्याचा रस कमी झाला आहे का?

- गेल्या अनेक वर्षांत न भेटलेल्या किंवा तुम्ही पूर्वी नावही ऐकलेले नाही अशा मित्रांना भेटण्याबद्दल तो अचानक बोलू लागला आहे का?

- त्याने कपडे इतस्तत: टाकणे थांबवले आहे किंवा तो स्वत:चे कपडे स्वत: धुऊ लागला आहे का? यामागील कारण या कपड्यांवरील वास किंवा खुणा दूर करणे हे असू शकते.

- तो तुम्हाला एकटीने आईवडिलांना किंवा मित्रमंडळींना भेटण्यास अचानक प्रोत्साहन देऊ लागला आहे का?

- तो पूर्वीच्या तुलनेत अधिक वारंवार चर्चासत्रे/अधिकृत/बिझनेस ट्रिप्सना उपस्थित राहू लागला आहे का किंवा दौऱ्यांवर जाऊ लागला आहे का?

- तो ऑफिसमध्ये करायला विसरलेल्या गोष्टी अचानक आठवून कधीही, कोणत्याही वेळी घराबाहेर जातो का?

- तो साखरपुड्याची अंगठी घालायला विसरू लागला आहे का?

- तुमच्या किंवा मुलांच्या वस्तू बाइक/कारमध्ये राहू नयेत यासाठी तो दक्ष राहू लागला आहे का?

- तो कामासाठी रात्रभर बाहेर जावे लागते म्हणून कपड्याची बॅग ऑफिसमध्ये किंवा कारमध्ये ठेवू लागला आहे का?

पत्नीची फसवणूक करणाऱ्या पतीमध्ये ही लक्षणे साधारणपणे लक्षात येतात. ही लक्षणे एकेकटी बघितली तर अनेकदा त्यांच्यात काहीच अर्थ नसतो पण अनेक लक्षणे एका ठराविक नमुन्यात दिसू लागली तर त्यातील इशारा तुम्ही ओळखला पाहिजे आणि कुठे पाणी मुरत आहे हे तपासले पाहिजे. तुमचे लग्न वाचवण्यासाठी तुम्हीच काही पावले उचलणे आवश्यक आहे. 

 

मद्यपी पती

मद्यपानाचे व्यसन ही सर्वत्र आढळणारी समस्या आहे. दारू पिऊन घरी येणाऱ्या व बायका-मुलांना मारझोड करून सगळ्यांची आयुष्ये बिघडवून टाकणाऱ्या नवऱ्यांना शतकानुशतके असंख्य स्त्रिया तोंड देत आहेत. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे बहुतेक स्त्रिया याला विरोध करण्याऐवजी भिऊन आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेतात. कदाचित त्यांच्या अशा काही समस्या असतात किंवा समस्यांशी जुळवून घेण्याचे मार्ग असतात पण नवरा मद्यपान करून तुमचे शोषण करत असेल, तर हे प्रकार थांबवण्याची वेळ आलेली आहे. दारूच्या या व्यसनाविरोधात धैर्याने लढा द्या आणि स्वत:चे व कुटुंबाचे रक्षण करा.   मद्यपी नवऱ्याला मदत करण्यासाठी काही मार्गदर्शक सूचना:

- तुमची प्रवृत्ती योग्य असावी. तुम्ही नवऱ्याचा तिरस्कार करता, तुम्हाला त्याची काळजी नाही किंवा त्याच्याबद्दल आदर नाही हे त्याला समजले तर त्याला मदत करणे कठीण होऊन बसते.

- मद्यपानाचे व्यसन म्हणजे एखाद्या औषधाचे व्यसन लागण्यासारखे आहे. ते सोडवण्यासाठी केवळ इच्छाशक्ती पुरेशी नाही, तर योग्य ते उपचार आवश्यक असतात. एखाद्या पुनर्वसन केंद्राची किंवा समुपदेशकाची मदत घ्या.

- तुमचा नवरा आजारी आहे असे समजून त्याच्याशी वागा व संभाव्य उपाय देण्याचा प्रयत्न करा. मद्यपींना संधी दिल्याशिवाय ते त्यातून बाहेर येत नाहीत.

- तुमच्या मद्यपी नवऱ्याला त्याच्या कृत्यांसाठी जबाबदार करा. तुम्हीच त्याला काही सबबी पुरवल्या किंवा पाठीशी घातले तर तो पुन्हापुन्हा मद्याच्या आहारी जाणार हे नक्की.

- दारू सोडवण्यासाठी उपलब्ध असलेल्या सर्व साधनांचा वापर करा. मद्याचे व्यसन हा जटील आजार आहे. त्यातून बाहेर येण्यासाठी अनेकांची गरज भासते. नवऱ्याच्या जवळच्या मित्रांना (दारूचे व्यसन नसलेल्या) जवळ करा आणि व्यसन सोडवण्यासाठी नवऱ्याचे मन वळवण्याची विनंती त्यांना करा. बरेच पुरुष बायकोच्या विनंत्या अव्हेरतात पण मित्रांचा सल्ला मान्य करतात.

- कधीच आशा सोडू नका; नाउमेद होऊ नका. एकदा केलेल्या प्रयत्नांत तुमच्या नवऱ्याची दारू सुटलेली नसली, तरी त्याची बिजे नक्कीच पेरली गेली आहेत. याची फळे भविष्यकाळात मिळतील हे नक्की.

- मद्याचे व्यसन हा संपूर्ण कुटुंबाला होणारा आजार आहे; सर्व कुटुंबियांवर याचा परिणाम होतो आणि उपचारही सर्वांवर केले जाणे आवश्यक असते.

- मद्यपी नवऱ्याला कधीही एकटे सोडू नका, कायम त्याच्यावर लक्ष ठेवा. सगळ्या पार्ट्या आणि गॅदरिंग्जना नवऱ्यासोबत जा आणि त्याच्यावर दक्षतेने नजर ठेवा. त्याच्यावर लक्ष ठेवणारे कोणी असेल तर तो सहसा मर्यादा ओलांडणार नाही.

- ज्या पार्ट्यांमध्ये तुमच्या नवऱ्याला त्याचे मित्र मद्यपानाचा आग्रह करतात, अशा पार्ट्या टाळा.

- तुमच्या नवऱ्याचा पगार थेट तुमच्या बँकखात्यात जमा होईल अशी सोय करून घ्या. म्हणजे त्याच्याजवळ दारू पिण्यासाठी जास्तीचा पैसाच राहणार नाही.

- समस्येच्या मुळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. व्यवसाचे मूळ कारण समजून घेण्यासाठी त्याच्याशी आतून संवाद साधण्याचा प्रयत्न करा.

- एकदा कारणे सापडली की, त्याच्याशी निगडित समस्या सोडवण्यासाठी उपाय व मार्ग निश्चित करता येतात.

कौटुंबिक हिंसाचार

तुम्ही कौटुंबिक हिंसाचाराचा सामना करत आहात का?

घराच्या चार भिंतीत स्त्रियांविरोधात होणाऱ्या हिंसाचाराचे प्रमाण खूप अधिक आहे. कौटुंबिक हिंसाचार व्यापक स्तरावर प्रचलित आहे पण तो फारसा दिसून येत नाही. आकडेवारीतून दिसून येते की, ४५ टक्के भारतीय स्त्रियांना त्यांचे नवरे थोबाडीत मारतात, लाथा मारतात किंवा मारहाण करतात (आयसीडब्ल्यूआर २००२). ३२ टक्के नवऱ्यांनी पत्नी गरोदर असताना तिच्याविरोधात हिंसाचार केलेला आहे. भारतात दर ६० मिनिटांनी एक स्त्री कौटुंबिक हिंसेमुळे दगावते. सामाजिक संकेतांमुळे स्त्रिया कौटुंबिक हिंसाचार सहन करतात. तसेच संस्कृतीची बंधने आणि आर्थिक परावलंबित्व यांमुळे स्त्रियांना पतीच्या घरी राहणे भाग पडते. कौटुंबिक हिंसाचाराला प्रतिबंध करण्यासाठी फौजदारी कायदा तर आहेच, शिवाय, अलीकडेच आलेल्या 'प्रोटेक्शन ऑफ विमेन फ्रॉम डोमेस्टिक व्हायोलन्स’ या दिवाणी कायद्याचा उद्देश स्त्रीला मदत, भरपाई व पाठिंबा पुरवणे हा आहे. तुमचा पती किंवा जोडीदार तुमच्या किंवा तुमच्या मुलाच्या विरोधात खालीलपैकी कोणते हिंसक कृत्य करतो का?

- भाषिक किंवा भावनिक हिंसाचार

- अपमान- तू आकर्षक नाहीस, स्मार्ट नाहीस, मला/माझ्या आईवडिलांना मान देत नाहीस असे बोलणे

- तुमच्या आईवडिलांवर आरोप करणे/त्यांचा अपमान करणे

- शिवीगाळ करणे (नेम-कॉलिंग)

- तुमच्या चारित्र्यावर किंवा वर्तनावर आरोप करणे

- हुंडा न दिल्याबद्दल अपमान करणे

- मुलगा जन्माला न घातल्याबद्दल अपमान करणे

- तुम्हाला किंवा तुमच्या ताब्यातील मुलाला शाळा, कॉलेज किंवा कोणत्याही शैक्षणिक संस्थेत उपस्थिती लावण्यास प्रतिबंध करणे

- तुम्हाला नोकरी करण्यास प्रतिबंध करणे

- तुम्हाला नोकरी सोडण्यासाठी जबरदस्ती करणे

- तुम्हाला किंवा तुमच्या ताब्यातील मुलाला घरातून बाहेर जाण्यास मनाई करणे

- तुम्हाला सामान्य दिनक्रमात एखाद्या व्यक्तीस भेटण्यापासून रोखणे

- आत्महत्येची धमकी देणे

आर्थिक हिंसाचार

- तुम्हाला स्वत:च्या किंवा तुमच्या मुलांच्या देखभालीसाठी पैसे न देणे

- तुम्हाला तसेच तुमच्या मुलांना अन्न, कपडे, औषधे न पुरवणे

- तुम्हाला रोजगार सुरू ठेवण्यापासून रोखणे

- तुम्हाला रोजगाराची संधी घेण्यास मज्जाव करणे

- तुमचा पगार, रोजंदारी तुमच्याकडून काढून घेणे

- तुमचा पगार, रोजंदारी वापरण्यापासून तुम्हाला रोखणे

- तुम्हाला तुम्ही राहत असलेल्या घरातून जबरदस्तीने बाहेर काढणे

- घराच्या कोणत्याही भागात प्रवेश करण्यास किंवा तो वापरण्यास तुम्हाला मज्जाव करणे

- तुम्हाला कपडे, वस्तू, किंवा सामान्य घरगुती वापराच्या वस्तू वापरण्यास परवानगी न देणे

- भाड्याच्या घरात राहत असल्यास घरभाडे न भरणे

शारीरिक हिंसाचार

- थोबाडीत मारणे

- मारहाण करणे

- आपटणे

- चावे घेणे

- लाथा मारणे

- बुक्के मारणे

- ढकलणे

- लोटून देणे

- कोणत्याही पद्धतीने शारीरिक वेदना देणे किंवा जखमा करणे

लैंगिक हिंसाचार

- जबरदस्तीने शारीरिक संभोग करणे

- तुम्हाला पोर्नोग्राफी किंवा अन्य काही अश्लिल साहित्य किंवा चित्रे बघण्याची जबरदस्ती करणे

- तुम्हाला त्रास देण्याच्या, तुमचा अपमान करण्याच्या किंवा कमी लेखण्याच्या उद्देशाने लैंगिक कृत्य करणे अथवा तुमच्या प्रतिष्ठेचा भंग करणारे किंवा अन्य कोणत्या प्रकारे खपवून न घेण्याजोगे लैंगिक कृत्य करणे

सरकारने नुकताच कौटुंबिक हिंसाचार (डीव्ही) कायदा संमत केला आहे हे लक्षात ठेवा. 

डीव्ही कायद्याची ठळक वैशिष्ट्ये:

- पीडब्ल्यूडीव्हीए पुरुषासोबत कौटुंबिक नात्यात राहणाऱ्या प्रत्येक स्त्रीला सामावून घेतो, लिव्ह-इन नातेसंबधात राहणाऱ्या, द्विभार्या विवाहात राहणाऱ्या, फसव्या लग्नांत राहणाऱ्या सर्व स्त्रियांना हा कायदा लागू आहे.

- हा कायदा स्त्रियांना सामाईक कुटुंबात राहण्याचा हक्क देतो

- या कायद्यानुसार, न्यायदंडाधिकारी हिंसाचार थांबवण्यासाठी त्वरित संरक्षक आदेश देऊ शकतात.

- हा कायदा दोन्ही पक्षांना स्वतंत्र किंवा संयुक्त पद्धतीने समुपदेशन पुरवतो.

- ३ दिवसांच्या आत केस नोंदवली गेली पाहिजे आणि ६० दिवसांच्या आत सर्व देय सहाय्य दिले गेले पाहिजे असे या कायद्यात निर्दिष्ट आहे.

कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनेची माहिती कोणाला द्यावी?

- नजीकचे पोलीस ठाणे

- संरक्षण अधिकारी (जिल्ह्याच्या महिला व कुटुंबकल्याण विभागाचे प्रकल्प संचालक). तुमच्या स्थानिक संरक्षण अधिकाऱ्याशी संपर्क साधा.

- सेवा पुरवणारे (राज्य सरकारद्वारे नियुक्त)

- न्यायदंडाधिकारी

तुम्हाला निवारा नसेल तर-

- निवाऱ्यासाठी: निवाराघरात निवारा पुरवण्याच्या दृष्टीने नजीकचे संरक्षण अधिकारी किंवा सेवा पुरवठादार

- वैद्यकीय सुविधांसाठी: कोणत्याही वैद्यकीय सुविधेसाठी नजीकचे संरक्षण अधिकारी किंवा सेवा पुरवठादार

- मदतीसाठी किंवा आदेश प्राप्त करण्यासाठी: न्यायदंडाधिकाऱ्यांकडे अर्ज करणे

- भरपाईच्या पेमेंटसाठी किंवा हानीसाठी: सामाईक घरात राहण्याचा अधिकार

- संरक्षण आदेश: कौटुंबिक हिंसाचाराच्या कोणत्याही कृत्याच्या प्रतिबंधासाठी

- मदत करणे किंवा प्रवृत्त करणे: नोकरीच्या ठिकाणी प्रवेश करणे किंवा मुलाच्या शाळेत जाणे; व्यक्तिगत, मौखिक, लेखी, इलेक्ट्रॉनिक किंवा टेलिफोनच्या माध्यमातून संपर्क साधणे

मालमत्तेपासून वंचित ठेवणे

- तिचे स्त्रीधन असलेली बँकेची लॉकर्स किंवा दोन्ही पक्षांची संयुक्त वा एकेरी बँकखाती ऑपरेट करणे

- तिच्या नातेवाईकांविरोधात किंवा अन्य व्यक्तींविरोधात हिंसाचार करणे

- अन्य कोणतेही कृत्य

- निवास आदेश

- पैशाच्या स्वरूपातील मदत

- ताबाविषयक आदेश

- भरपाईचे आदेश

हुंड्यासाठी होणारा छळ

हुंड्याची प्रथा

भारतात प्रत्येक समाजामध्ये हुंड्याची प्रथा प्रचलित आहे. विवाहसंस्थेत गुंतलेल्या व भवतालच्या असंख्य लोकांच्या आयुष्यांवर ही प्रथा अनिष्ट परिणाम करत आहे. 

जेव्हा एखाद्या घराण्याच्या राजकन्येचे लग्न होत असे तेव्हा राजा अत्यानंदाच्या भरात त्याच्या संपत्तीचा व राज्याचा काही भाग जावयाला एका भव्य सोहळ्यामध्ये प्रदान करत असे. त्याचे मंत्रीही या राजेशाही प्रथेचे पालन एक शिष्टाचार म्हणून करू लागले. मग राजाची सामान्य प्रजा, मग ती गरीब असो किंवा श्रीमंत, या दिखाऊ प्रथेचे पालन 'प्रतिष्ठा’ जपण्यासाठी करू लागली आणि त्यांनाही आपण राजेशाही असल्याचा आभास यातून होऊ लागला. 

विवाहातील ही विचित्र प्रथा गरीब व वंचित कुटुंबांमध्येही वेगाने जाऊन पोहोचली आणि त्याभवती प्रतिष्ठेच्या भ्रामक कल्पना गुंफल्या गेल्या. तेव्हापर्यंत मुलीला जन्म देण्याशी आणि तिचे पालनपोषण करण्याशी एक अपराधी भावना जोडली गेली होती. त्यातच मुलींचा जन्मदर मुलग्यांच्या तुलनेत वाढल्यामुळे ही भ्रष्ट प्रथा अधिक दृढ होत गेली. प्रत्येक घरात मुलग्यांच्या तुलनेत जास्त मुली असणे ही कुटुंबातील ज्येष्ठांसाठी धोक्याची घंटा होती. त्यांनी मुलींच्या लग्नाची घाई सुरू केली व त्यातून स्पर्धा लागली. 

अलीकडील काळात हुंड्याची प्रथा रुजत गेली.  हुंड्यापोटी मिळणाऱ्या वस्तू, सोने आणि पैसे नवऱ्यामुलासाठी अभिमानाची आणि दिखाव्याची बाब झाली. 

मुलीचे आईवडीलही जावयाला या सगळ्या भेटवस्तू देऊन सुटकेचा नि:श्वास टाकू लागले. कारण, हे सगळे दिल्यामुळे आता त्यांच्या मुलीला सासरी मान मिळेल, चांगली वागणूक मिळेल असे त्यांना वाटू लागले. 

नवऱ्यामुलींनाही आपल्या आईवडिलांकडून खूप काही मिळणे अभिमानास्पद वाटू लागले. नवीन घरात प्रवेश केल्यानंतर आपले माहेर किती श्रेष्ठ आहे हे दाखवून देण्याची प्रत्येक संधी त्या घेऊ लागल्या. त्या ज्या घरात जातात त्यात त्यांची ऐहिक श्रेष्ठता प्रस्थापित करण्यासाठी हुंडा महत्त्वाचा ठरतो. भलामोठा हुंडा घेऊन न आलेल्या सुनांचा दर्जा कमी असतो आणि त्या एकतर सासरच्यांशी भांडतात किंवा आईवडिलांना अधिक हुंडा देण्यास भाग पाडतात, जेणेकरून, त्यांना नवऱ्याच्या घरात आदराचे स्थान मिळेल. 

हुंड्याचे परिणाम 

वर दिलेल्या संघर्षांचा परिणाम कुटुंबातील प्रत्येक सदस्यावर होतो आणि हे संघर्ष वेगवेगळे आकार घेऊ शकतात. उदाहरणार्थ, कुटुंबाचे विभाजन होते, जोडपी वेगळी होतात, न संपणारी शत्रुत्वाची भावना निर्माण होते, कोर्टात खटले होतात, आनंद पार हरवून जातो आणि व्यक्तिगत हाडवैर निर्माण होते. 

लग्नाची चर्चा सुरू झाली की बहुतेक सर्व कुटुंबात स्त्रीच स्त्रीची शत्रू असल्यासारखे चित्र निर्माण होते. सुनेने लग्नानंतर किती पैसा व सोन्याचे दागिने आणायचे आणि आपल्या ताब्यात द्यायचे याबद्दल वाटाघाटी करताना नवऱ्यामुलाची आई जिभेच्या एका फटकाऱ्याने सर्व कुटुंबाला गप्प करते.

आपणही लग्न करून आलो तेव्हा हुंडा घरात आणला होता असा युक्तिवाद काही स्त्रिया करतात, तर काही स्त्रिया सुनेने आणलेले दागिने आपल्या मुलीला तिच्या लग्नात हुंडा म्हणून देतात. हे सुनेला व तिच्या आईवडिलांना आवडत नाही. 

नवऱ्यामुलाचे कुटुंबीय किंवा स्वत: नवऱ्यामुलाने मागितलेला बेसुमार हुंडा देणे परवडत नाही, अशा आईवडिलांच्या परिस्थितीचा विचार करून बघा. हुंड्याच्या या प्रथेमुळे मुलीचे लग्न करून देणे त्यांच्यासाठी ओझे होते. 

हुंडेच्या प्रथेमुळे मुलींबद्दल घृणा निर्माण होते आणि नवजात मुलींच्या हत्येसारख्या गुन्ह्यांकडे लोक प्रवृत्त होतात,  बळजबरीने गर्भपात घडवले जातात, कुटुंबाच्या एकीला तडे जातात, जोडप्यांचे चांगले नातेसंबंध खराब होतात, शत्रुत्व वाढते आणि तरुण सुनांना जाळून किंवा अन्य मार्गांनी ठार मारण्याचे प्रकारही होतात. 

हुंडा मागणे हा पुरुषार्थ नव्हे!

लोभीपणा, सहज पैसा मिळवण्याचा मोह, मित्रमंडळींमध्ये खोटी प्रतिष्ठा या कारणांमुळे मुलगा मुलीच्या आईवडिलांकडे हुंड्याची मागणी करतो. मात्र, आपण स्वत:ला पुरुषवेश्येप्रमाणे विकत आहोत हे त्याच्या लक्षात येत नाही. 

मुलाच्या आईवडिलांनी मागितलेल्या हुंड्याची मागणी मुलीचे आईवडील पूर्ण करत नाहीत, तोपर्यंत तो अत्यंत आज्ञाधारक मुलासारखा वागतो. 

कष्टाशिवाय मिळालेला पैसा आपल्याला आयुष्यात कधीही वर उचलणार नाही हे लग्नाला उभ्या राहिलेल्या मुलाने समजून घेतलेच पाहिजे. मुलीच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती त्याने संवेदनशीलतेने समजून घेतलीच पाहिजे. 

लक्षात ठेवा हुंडा घेतल्याचा अपराधीभाव तुमच्या मनात कायम राहील आणि हुंडा म्हणून जे काही मिळाले आहे त्याचे खऱ्या अर्थाने मालक तुम्ही होऊ शकणार नाही.

तुम्ही पालक म्हणून काय करू शकता?

हुंडा मागणे हा समाजात प्रतिष्ठा कमावण्याचा मार्ग नाही, तर एक शाप आहे, एक पाप आहे, हे मुलाचे लग्न करू इच्छिणाऱ्या प्रत्येक कुटुंबाने समजून घेतले पाहिजे. हुंडा मागणाऱ्या मुलाचा व त्याच्या कुटुंबाचा समाजातील दर्जा प्रत्यक्षात खालावतो. 

नवीन नाते जोडताना आर्थिक बाबीमुळे काही कमी पडत असेल तर ते समजून घेण्याची व त्याच्याशी जुळवून घेण्याची नैतिक जबाबदारी नातेवाईकांनी व आईवडिलांनी स्वीकारावी तसेच समोरच्याला अवघडून टाकणाऱ्या तसेच कमी लेखणाऱ्या टिप्पण्या करणे टाळावे. तरच हुंड्याची अनिष्ट प्रथा दूर होईल किंवा मुळापासून नष्ट होईल आणि लग्नेच्छुकांची आयुष्ये सोपी होतील. 

आईवडिलांनी आपल्या इच्छेने मुलामुलींना दिलेली मालमत्ता नवविवाहितांनी नाकारू नये पण विवाहासाठी पूर्वअट म्हणून केलेल्या कोणत्याही मागणीला ठाम विरोध करावा. 

हुंड्यासारखी अनिष्ट प्रथा मोडून काढण्यासाठी प्रत्येक जबाबदार पालकाने प्रोत्साहन द्यावे तसेच आपल्या मुलांच्या सुखी वैवाहिक आयुष्यासाठी व मन:शांतीसाठी प्रयत्न करावे.

हुंड्यासाठी होणाऱ्या छळाची तक्रार

तुमच्या तक्रारीत कोणत्या बाबींचा समावेश हवा?

- विवाहाचे तपशील, उदाहरणार्थ, निमंत्रण पत्रिका, विवाह प्रमाणपत्र, फोटो, व्हिडिओ आदी

- ज्यांच्याविरोधात आरोप आहेत अशा व्यक्तींची नावे व त्यांचे पत्ते, पासपोर्ट्स आदी तपशील

- छळाचे तपशील, उदाहरणार्थ, छळाचा कालावधी, काळ, स्थळ व प्रकार

- हुंडा मागितला असल्यास त्याचे तपशील

- तुम्ही हुंड्याची रक्कम बँकखात्याद्वारे दिली असेल, तर बँकेचे स्टेटमेंट

- हुंडा धनादेशाद्वारे (चेक) दिला असेल तर त्याचे तपशील

- ज्या व्यक्तीला हुंडा दिला गेला, त्याचे तपशील

- शारीरिक हिंसा झाली असेल, तर जखमांचे व त्या करण्यासाठी वापरलेल्या हत्यारांचे तपशील

- लग्न जमवणाऱ्या व वाद मिटवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या वडीलधाऱ्या व्यक्तींचे तपशील

- मध्यस्थ/समुपदेशन सत्र झाली असतील, तर ती कुठे झाली याचे तपशील

- साक्षीदारांचे, विशेषत: स्वतंत्र साक्षीदारांचे,  आणि तुमच्या मुलांचे तपशील

- लग्नादरम्यान काही लेखी करार झाले असतील, तर त्याच्या प्रती

- दागिने/रोख पैसे/कपडे/वाहने आदी जंगम स्वरूपातील भेटवस्तूंचे तपशील तसेच भूखंड/फ्लॅट आदी स्थावर स्वरूपातील भेटींचे तपशील

- तक्रार नोंदवण्यास विलंब झाला असेल, तर त्या विलंबामागील कारणे

- पीडितेची स्वाक्षरी व संपर्क क्रमांक

४९८ (अ) कायद्याचा गैरवापर टाळण्यात व तुमची केस मजबूत करण्यात आम्हाला मदत करा

- नेहमी लक्षात ठेवा! जोडपे व मुलांनी परस्परात केलेले समुपदेशन अन्य कोणत्याही समुपदेशनाहून चांगले ठरते.

- चुका माणसाच्या हातून होतातच! चुका दोन्ही बाजूंनी होऊ शकतात. आपल्या चुकांवर पांघरुण घालण्यासाठी कोणीही कायद्याचा वापर करू नये

- पोलीस ठाण्याची पायरी चढण्यापूर्वी दोघांनी परस्परांना समजावण्याचा प्रयत्न करा.

- तुमच्याबाबत घडलेल्या बाबी कधीही अतिशयोक्त स्वरूपात मांडू नका. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, समस्येबाबत स्पष्ट, मोकळेपणाने व मुद्दयाला धरून सांगा.

- छळाशी संबंध नसलेल्यांची नावे छळाशी जोडू नका. प्रामाणिकपणे तक्रार करा.

- नेहमी लक्षात ठेवा! ४९८ (अ) हा कायदा सुडासाठी नाही, तर छळ करणाऱ्यांना कडक शिक्षा करण्यासाठी आहे, जेणेकरून, बाकीच्यांनाही धडा मिळावा.

- तुमच्या हतबलतेचा फायदा घेण्यामध्ये अनेकांचे हितसंबंध गुंतलेले असू शकतात. ते तुम्हाला छळाची तथ्ये अतिशयोक्त स्वरूपात मांडण्याचे, छळात सहभागी नसलेल्यांची नावे तक्रारीत समाविष्ट करण्याचे, हुंड्याची रक्कम वाढवून सांगण्याचे दिशाभूल करणारे सल्ले देऊ शकतात. 

- तुम्हाला जे भोगावे लागले ते व्यक्त करण्यात कोणाची मदत हवी असेल, तर मान्यताप्राप्त स्वयंसेवी संस्थांची किंवा हेल्पलाइन्सची मदत घ्या.

तुमची हुंड्याची रक्कम परत मिळवून देण्याचा वायदा करणाऱ्या लबाड लोकांची मदत घेऊ नका, ते समोरच्यांकडून खंडणी मिळवतात व तुमची केस कमकुवत करतात. 

- तुमच्या तक्रारीची मसुदा तयार केला जात असताना तेथे उपस्थित राहा आणि हा मसुदा पोलिस ठाण्यात दाखल करण्यापूर्वी, तो लिहिणाऱ्यांकडून, मोठ्याने वाचून घ्या.

- केस मजबूत करण्याच्या उद्देशाने तक्रारीतील आशय अतिशयोक्त स्वरूपात मांडण्याचा सल्ला काही पीडितांना दिला जातो.  प्रत्यक्षात मात्र तक्रारीचे सर्वांत मोठे बलस्थान हे पीडितेने सादर केलेले पुरावे असतात. तक्रारीतील मजकुराला प्रत्यक्ष तथ्यांचा आधार मिळाला नाही, तर केस कमकुवत होते व पीडितेला न्याय मिळणे कठीण होते.

- प्रकरणाचा तपास करण्यासाठी तसेच आरोपीला अटक करण्यासाठी संबंधित पोलिस किंवा अधिकारी पैशाची मागणी करत असतील, तर ते कधीही देऊ नका. त्यांच्या वरिष्ठांच्या कानावर हा प्रकार घाला.

- तुमच्या मुलीला जो जिव्हाळा मिळाला पाहिजे, जसे जपले गेले पाहिजे, त्या जिव्हाळ्यावर व काळजीवर सुनेचाही अधिकार आहे हे कधीच विसरू नका.

- लक्षात ठेवा! ४९८ (अ) हे समोरच्यावर घटस्फोटासाठी दबाव आणण्याचे साधन नाही. विवाहातील प्रतिकूलतांवर तोडगा काढण्यासाठी अन्य अनेक कायदेशीर प्रक्रिया आहेत.

- ४९८ (अ) हे मुलांचा ताबा मिळवण्यासाठी वापरण्याचे हत्यारही नाही. यासाठी पर्यायी कायदेशीर पद्धती आहेत.

- ज्या दिवशी तक्रार दाखल झाली, त्याच दिवशी आरोपीला अटक करा असा दबाव पोलिसांवर कधीच आणू नका, कारण, विश्वासार्ह पुरावा जमवण्यासाठी वेळ लागतो. मात्र, तक्रार दाखल करतानाच बहुतेक पुरावे सादर करून तुम्ही पोलिसांना तपासाचा वेग वाढवण्यात मदत नक्कीच करू शकता.

- आरोपीचा देशाबाहेर जाण्याचा बेत आहे अशी माहिती तुम्हाला मिळाली, तर तुम्ही ते तपास अधिकाऱ्यांना त्वरित सांगणे आवश्यक आहे. आवश्यकता भासल्यास, पोलिस सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच समुद्रीतळांवर (सीपोर्ट्स) इशारा देऊ शकतात.

- जर तुम्ही पालक असाल, तर मुलीकडून सर्व तथ्यांची खात्री करून घेतल्याखेरीज तक्रार दाखल करू नका. तपासासाठी मुलीचा जबाब महत्त्वाचा असतो.

- देशभरात ४९८ (अ) या कायद्याखाली आरोपी दोषी ठरवले जाण्याचा दर अत्यंत कमी आहे. यामागे अनेक कारणे आहेत. तपासादरम्यान जे काही सांगितले त्यावर खटल्यादरम्यान ठाम राहून, तुम्ही आम्हाला, हा दर सुधारण्यात मदत करू शकता.