मोटार परिवहन विभाग
महाराष्ट्र पोलिसांची दळणवळणाची गरज पूर्ण करण्यासाठी १९४८ मध्ये वाहन परिवहन विभागाची स्थापना करण्यात आली. त्यावेळी या विभागाचे नेतृत्व पोलीस अधिक्षकाच्या हुद्दयाचा अधिकारी करत असे. हा अधिकारी ऑटोमोबाइल इंजिनीअरिंगच्या क्षेत्रातील तज्ज्ञ असे. तंत्रज्ञानाची पार्श्वभूमी असलेले अनेक पोलीस उपअधीक्षक व निरीक्षक स्तरावरील अधिकारी त्याला सहाय्य करत होते.
एसआरपीएफच्या प्रत्येक जिल्हा युनिट आणि बटालियनमध्ये पोलीस वाहनांच्या दैनंदिन देखभालीसाठी वाहन परिवहन विभाग असतो. वाहन दुरुस्तीची मोठी कामे पुणे, औरंगाबाद आणि नागपूर या तीन शहरांतील तीन मध्यवर्ती केंद्रांमध्ये केली जातात. वाहनांच्या बॉडी-बिल्डिंगचे काम पुणे येथे केले जाते.
राज्य पोलीस दलाच्या कार्यक्षमतेमध्ये चलनशीलता (मोबिलिटी) अत्यंत महत्त्वाची आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या समस्या हाताळणे, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी बंदोबस्त राखणे आणि पोलिसांचे सामान्य कामकाज या सगळ्याच्या दृष्टीने, रस्त्यांवर उत्तम चालणाऱ्या आणि यांत्रिकदृष्ट्या खात्रीशीर वाहनांची, गरज नेहमीच भासते. वाहन परिवहन विभाग ही महत्त्वाची कामे कार्यक्षमतेने पार पाडतो.
वाहन परिवहन विभागाचा १९८०च्या दशकात झपाट्याने विस्तार झाला. बहुतेक सर्व जिल्हा युनिट्समधील तसेच सीआरपीएफ बटालियनमधील एमटी (मोटर परिवहन) विभागाचे नेतृत्व पोलीस निरीक्षकाच्या दर्जाचा अधिकारी करतो. राज्यस्तरीय वाहन परिवहन विभागाच्या प्रशासनाची जबाबदारी, १९९४ सालापासून, डीआयजीपी/आयजीपी दर्जाचे अधिकारी करत आहेत. एमटी पुणेचे प्रमुख असलेले जिल्हा पोलीस अधीक्षक दर्जाचे व एमटी मुंबईचे प्रमुख असलेले पोलिस उपायुक्त दर्जाचे अधिकारी त्यांना सहाय्य करतात. पुणे येथील सेंट्रल स्टोअर पर्चेस ब्रांच अर्थात मध्यवर्ती स्टोअर खरेदी शाखा सुटे भाग, टायर्स, ट्युब्ज, बॅटरी व अन्य संकीर्ण वस्तूंची खरेदी कंत्राट/निविदा यांच्या माध्यमातून करते आणि विविध युनिट्सच्या (मुंबई युनिटचा अपवाद वगळता) गरजांची पूर्तता करते. सध्या राज्य पोलिसांकडे ७८७१ वाहने, ५ स्पीड बोटी आणि ६ अन्य बोटी आहेत. पुणे येथील पूर्ण क्षमतेचे प्रशिक्षण केंद्र अधिकारी, तंत्रज्ञ व चालकांना प्रशिक्षण पुरवते. अधिक कार्यक्षमता व उत्कृष्ट कामगिरी साध्य करण्यासाठी प्रशिक्षण केंद्र आधुनिक उपकरणांनी सुसज्ज आहे.
ए) महाराष्ट्रातील विविध वाहनांचे ताफे
अनुक्रमांक |
वाहनांचा प्रवर्ग |
ताफ्यातील एकूण वाहने |
१ |
स्पेशल पर्पज व्हेइलक |
५९ |
२ |
मोठी वाहने |
८३६ |
३ |
हलक्या वजनाची वाहने |
७२८ |
४ |
जीप प्रवर्ग |
२५९० |
५ |
कार प्रवर्ग |
३६१ |
६ |
मोटरसायकल |
३२९७ |
एकूण |
७८७१ |
बी) मुंबई सीपी पूलमधील वाहनांचे ताफे
अनुक्रमांक |
वाहनांचा प्रवर्ग |
ताफ्यातील एकूण वाहने |
१ |
स्पेशल पर्पज व्हेइकल |
४९ |
२ |
मोठी वाहने |
२०६ |
३ |
हलक्या वजनाची वाहने |
८२ |
४ |
जीप प्रवर्ग |
९६० |
५ |
कार प्रवर्ग |
१५५ |
६ |
मोटरसायकल |
१४०३ |
एकूण |
३०५५ |
एकूण ताफा (ए) + (बी) ७८३१ + ३०५५ = १०९२६
संपर्क क्रमांक/फॅक्स/ईमेल – वाहन परिवहन विभाग
हुद्दा |
दूरध्वनी क्रमांक |
विशेष पोलीस महानिरीक्षक वाहन परिवहन, एमएस, पुणे |
०२०- २५८८३८४१ |
पोलीस अधीक्षक वाहन परिवहन, एमएस, पुणे |
०२०-२५८८३३६६ |
अतिरिक्त पोलीस अधीक्षक, एमटी विभाग, नागपूर |
०७१२- २५६६७६७ |
पोलीस उपअधीक्षक (प्रशासन) एमटी, एमएस, पुणे |
०२०-२५८८०७१८ |
पोलीस उपअधीक्षक, दक्षिण विभाग, पुणे |
०२०-२५८८०७१८ |
पोलीस उपअधीक्षक, पूर्व विभाग, नागपूर |
०७१२- २५६६७६७ |
पोलीस उपअधीक्षक, मध्यवर्ती वाहन परिवहन, कार्यशाळा, पुणे |
०२०-२५८८०७१८ |
पोलीस उपअधीक्षक, मध्यवर्ती वाहन परिवहन, कार्यशाळा, औरंगाबाद |
०२४०- २३३४११४ |
पोलीस उपअधीक्षक, मध्यवर्ती वाहन परिवहन, कार्यशाळा, नागपूर |
०७१२- २५६६७६७ |
पोलीस निरीक्षक, बॉडी बिल्डिंग विभाग, पुणे |
०२०- २५८८००८४ |
पोलीस निरीक्षक, एलएमओ, ठाणे |