अभिप्राय / तक्रार फॉर्म

ठळक बातम्या

प्रेस नोट - सीपीआर, पुणे येथे दिवंगत वसंत केशव सराफ, निवृत पोलीस महसंचालक यांना श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम संपन्न झाला. पोलीस स्‍मृतीदिन - २०२४ थेट प्रसारण विशेष सेवा पदक महिला सुरक्षा हेल्‍पलाइन क्र. ८९७६००४१११, ८६५७२२२७७७, ०२२४५१६१६३५ सिटीझन पोर्टलवरील नागरीकांचे सुविधा यामधील ई-तक्रारी बाबत. पोलीस शिपाई भरती २०२२-२३, माहिती डाइल ११२ सिटीझन पोर्टल एन.आई.सी. ईमेल - Kavach Authentication बाबत मार्गदर्शन देशाच्या सेवेत भारतीय पोलीस

महाराष्ट्र राज्य पोलीस

अधिकृत संकेतस्थळ

मोहल्ला समिती

"वेगाने बदलणाऱ्या वातावरणात पोलिसिंग करणे हे जटील काम झाले आहे. जनतेच्या सहभागाशिवाय पोलिसिंग साध्य होत नाही हा दृष्टिकोन लोकशाहीने स्वीकारलेला आहे. विशिष्ट धर्म, जाती, केवळ लोकसंख्येमुळे दबावाखाली आलेल्या आपल्यासारख्या लोकशाहीबाबत तर हे अधिक खरे आहे. मोहल्ला समिती हे सामुदायिक पोलिसिंग उपक्रमांचे अविभाज्य अंग आहे.”

नावाप्रमाणेच मोहल्ला समित्या या स्थानिक भागात स्थापन केल्या जातात. यामध्ये समाजाच्या प्रत्येक स्तरावरील लोकांचा समावेश असतो.  मोहल्ला समित्यांची स्थापना व त्यांना सहाय्य यांची जबाबदारी स्थानिक पोलीस ठाण्यावर असते. पोलिसांना कायदा व सुव्यवस्था राखण्यात मदत करणे तसेच आपल्या भागातील गुन्ह्यांचा प्रतिबंध करणे हे मोहल्ला समित्यांचे मुख्य काम असते.  मोहल्ला समित्यांचे सदस्य पोलिसांचे कान व डोळे होऊन काम करतात आणि सांप्रदायिक, सामाजिक, कायदा-सुव्यवस्थाविषयक माहिती ते स्थानिक क्षेत्र अधिकाऱ्याला (बीट ऑफिसर) देतात. या अधिकाऱ्याच्या ते सतत संपर्कात असतात. याशिवाय कायदा व सुव्यवस्थाविषयक समस्यांचा प्रतिबंध व व्यवस्थापन करण्यात या समित्या महत्त्वाची भूमिका बजावतात. मोहल्ल्या समित्यांच्या वर्षभर नियमित बैठका होत राहतात. बीट कर्मचाऱ्यांच्या सक्रिय सहभागातून स्थानिक गुन्हे व वाद निवारण्याबद्दल या समित्या चर्चा करतात. मोठ्या उत्सवांच्या काळात संबंधित भागात शांतता राखण्यासाठी समित्यांच्या विशेष बैठका बोलावल्या जातात. 

"समाजातील प्रतिष्ठित व आदरणीय सदस्यांचे नामांकन मोहल्ला समितीवर व्हावे यासाठी विशेष काळजी घेतली जाते. बैठकांमध्ये चर्चिल्या गेलेल्या उपाय व निर्णयांचा प्रसार सदस्यांच्या माध्यमातून समाजात केला जातो. गुन्हे प्रतिबंध उपाय निश्चित करणे व अमलात आणणे याबाबत मोहल्ला समितीच्या सदस्यांनी दिलेल्या सूचनांना पोलीस ठाण्यात बरेच महत्त्वा दिले जाते.”

"मोहल्ला समिती अभियानाचा लोकशाहीवादी दृष्टिकोन व जनसहभाग यांची गेल्या काही वर्षांत सर्वदूर प्रशंसा झाली आहे. मोहल्ला समित्यांनी त्यांची उपयुक्तता वेळोवेळी सिद्ध केली आहे आणि महाराष्ट्र पोलीस समुदायाच्या सामुदायिक पोलिसिंग उपक्रमांचा त्या आता अविभाज्य भाग झाल्या आहेत.”