अभिप्राय / तक्रार फॉर्म

ठळक बातम्या

ALL INDIA POLICE DUTY MEET 2025 - DAY 2 LIVE STREAMING LINK महिला सुरक्षा हेल्‍पलाइन क्र. ८९७६००४१११, ८६५७२२२७७७, ०२२४५१६१६३५ सिटीझन पोर्टलवरील नागरीकांचे सुविधा यामधील ई-तक्रारी बाबत. पोलीस शिपाई भरती २०२२-२३, माहिती डाइल ११२ सिटीझन पोर्टल एन.आई.सी. ईमेल - Kavach Authentication बाबत मार्गदर्शन देशाच्या सेवेत भारतीय पोलीस

महाराष्ट्र राज्य पोलीस

अधिकृत संकेतस्थळ

ठळक बातम्या

ALL INDIA POLICE DUTY MEET 2025 - DAY 2 LIVE STREAMING LINK महिला सुरक्षा हेल्‍पलाइन क्र. ८९७६००४१११, ८६५७२२२७७७, ०२२४५१६१६३५ सिटीझन पोर्टलवरील नागरीकांचे सुविधा यामधील ई-तक्रारी बाबत. पोलीस शिपाई भरती २०२२-२३, माहिती डाइल ११२ सिटीझन पोर्टल एन.आई.सी. ईमेल - Kavach Authentication बाबत मार्गदर्शन देशाच्या सेवेत भारतीय पोलीस

समुदाय धोरण

महाराष्ट्र पोलिसांनी पोलिसिंगच्या कामात जनतेला सहभागी करून घेण्यासाठी अनेक उपक्रमांना संस्थात्मक स्वरूप दिले आहे. शहरीकरण व औद्योगिकीकरणाच्या वाढत्या वेगामुळे महाराष्ट्राची लोकसंख्याशास्त्रीय रचना गेल्या दोन दशकांत कमालीची बदलली आहे. अर्थात, पोलिसिंगची पद्धत ग्रामीण व शहरी भागात बरीच वेगळी आहे. 

सुरक्षा व सुरक्षितता यांच्या निश्चितीसाठी पोलिसांसोबत जनतेनेही सक्रियपणे काम करणे हा समुदाय पोलिसिंग अर्थात कम्युनिटी पोलिसिंगच्या संकल्पनेचा पाया आहे. सार्वजनिक व्यवस्था राखण्याच्या तसेच समाज गुन्हेमुक्त राखण्याच्या प्रक्रियेत समुदायातील सदस्यांना सहभागी करून घेतले नाही, तर पोलिस यंत्रणांना त्यांची कर्तव्ये निभावणे कठीण होईल. हा दृष्टिकोन ठेवून, मोहल्ला एकता समिती किंवा ग्रामसुरक्षा दल यांसारखे उपक्रम ग्रामीण व शहरी भागात हाती घेण्यात आले. ग्रामसुरक्षा दले ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी गस्त घालतात आणि मालमत्तेसंदर्भातील गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यात पोलिसांना मदत करतात. मोहल्ला एकता समित्या विविध क्षेत्रांतील लोकांच्या सहभागातून सांप्रदायिक सौहार्ग राखण्याचा प्रयत्न करतात. 

ग्रामसुरक्षा दले व मोहल्ला एकता समितीच्या कार्याचे तपशील मुख्य पानावर (होम पेज) उपलब्ध आहेत.