अभिप्राय / तक्रार फॉर्म

ठळक बातम्या

पोलीस शिपाई भरती २०२४-२५, माहिती

महाराष्ट्र राज्य पोलीस

अधिकृत संकेतस्थळ

ठळक बातम्या

पोलीस शिपाई भरती २०२४-२५, माहिती

ज्येष्ठ नागरिकांसाठी

१. ज्येष्ठ नागरिकांबाबत घडणाऱ्या बहुतांश गुन्ह्यांमध्ये त्यांना ओळखणाऱ्या व्यक्तींचाच सहभाग असतो. उदाहरणार्थ, नोकर, नातेवाईक, विक्रेते आदी. 

२. हे लोक सहसा पोलीस रेकॉर्डवर नसतात. 

३. घरगुती मदतनीस/नोकरमाणसे काम सोडून जातील या भीतीतून त्यांची माहिती सहसा पोलिसांना कळवली जात नाही. 

हे करा आणि हे करू नका

- नजीकच्या पोलीस ठाण्याच्या मदतीने एखाद्या व्यक्तीचा पूर्वेतिहास पडताळल्यानंतरच तिला कामावर ठेवावे. 

- कायम ओळखपत्र जवळ बाळगा

- नोकरमंडळी/अपरिचित लोकांसमोर आर्थिक बाबींवर चर्चा करू नका.

- तुमचे मौल्यवान सामान कोणत्याही बँकेच्या सेफ डिपॉझिट व्हॉल्टमध्ये ठेवा.

- नोकरमंडळींशी माणुसकीने वागा

- तुमच्या नोकरांच्या नातेवाईक व मित्रमंडळींना सामान्यपणे तुमच्या घरी येऊ देऊ नका. तुमच्या मदतनिसाला भेटायला वारंवार कोणी येत असेल तर त्याचा/तिचा पूर्वेतिहास तपासून घ्या. अशा व्यक्तींची संख्या कमीतकमी राखा. 

- तुम्ही एकटे राहत असाल, तर तुमच्या शेजाऱ्यांना आणि हाउसिंग सोसायटीच्या सेक्रेटरींना तशी माहिती देऊन ठेवा.

- डोअर अलार्म, इलेक्ट्रॉनिक आय-बेल यांसारख्या आधुनिक सुरक्षा उपकरणांचा वापर नेहमीच उपयुक्त ठरतो. अशी उपकरणे बसवून घेण्यासाठी तज्ज्ञांशी संपर्क साधा.

- तुमच्या घराच्या प्रवेशद्वारावर पीपहोल करून घ्या आणि नेहमी परिचित व ओळख पटलेल्या व्यक्तींनाच घरात प्रवेश द्या. डबल डोअर प्रणाली बसवून घ्या. अपरिचितांशी बोलताना कायम मुख्य दार बंदच ठेवा किंवा शेजाऱ्यांना व सुरक्षा कर्मचाऱ्याला सांगूनच अपरिचितांशी बोला.

- घराच्या मूळ किल्ल्या किंवा जास्तीच्या किल्ल्या कधीही उघड्यावर किंवा सहज सापडतील अशा जागी ठेवू नका.

- दुरुस्त्यांसाठी आलेले लोक, विक्रेते यांची ओळख पटल्यानंतरच त्यांना घरात प्रवेश द्या तसेच त्यांना प्रवेश देण्यापूर्वी सुरक्षा कर्मचाऱ्यांना याची माहिती देऊन ठेवा.

- तुम्ही एखाद्या कामगाराला किंवा विक्रेत्याला घरात प्रवेश दिलात, तर त्याला घरात एकटा कधीच सोडू नका. 

- ठळक, व्यवस्थित उजेड असलेल्या तसेच वर्दळीच्या ठिकाणी तुम्ही अधिक सुरक्षित असता.

- चालायला किंवा धावायला गेल्यानंतर आसपासच्या वातावरणाबाबत सजग राहा. अशा वेळी इअर फोन्स वगैरे वापरणे टाळा.

- आपत्कालीन औषधे तसेच फॅमिली डॉक्टरांचा संपर्क क्रमांक तसेच आपत्कालीन वैद्यकीय सेवांचे क्रमांक हाताशी (सहज सापडतील असे) ठेवा.