अभिप्राय / तक्रार फॉर्म

ठळक बातम्या

महाराष्ट्र राज्य पोलीस

अधिकृत संकेतस्थळ

ठळक बातम्या

सुरक्षितता संबंधी टिपा

सायबर गुन्हे प्रतिबंध

कायदा प्रवर्तन यंत्रणा म्हणजेच कायद्याची अमलबजावणी करणाऱ्या यंत्रणा नागरिकांमध्ये गुन्ह्यांबाबत जागरूकता वाढवण्यासाठी तसेच गुन्ह्यांच्या प्रतिबंधाच्या हेतूने वारंवार नागरिकांपर्यंत पोहोचणारे तसेच त्यांना प्रशिक्षण देणारे उपक्रम राबवत असतात. सायबर गुन्हे व त्यांना बळी पडणारे नागरिक ही समस्या हाताळण्यासाठी पोलिस व समाजामध्ये संवाद घडवून आणण्याचा तसेच तो पुढे नेण्याचा एक प्रयत्न म्हणून, नॅशनल व्हाइट कॉलर क्राइम सेंटर (एनडब्ल्यूसीथ्री), इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ चीफ्स ऑफ पोलिस (आयएसीपी), ऑफिस ऑफ कम्युनिटी ओरिएंटेड पोलिसिंग सर्व्हिसेस (द कॉप्स पोलिस), अमेरिका व न्यायखात्याने प्रशिक्षण प्रारूपांची (मोड्युल्स) एक मालिकाच विकसित केली आहे. इंटरनेट व कम्प्युटरशी निगडित घोटाळ्यांचे सामान्यपणे आढळणारे प्रकार ओळखणे तसेच याला बळी पडणे टाळण्यासाठी लोकांना सूचनात्मक साधनांनी सुसज्ज करणे असे या मोड्युल्सचे साधारण स्वरूप आहे. या समन्वयात्मक प्रयत्नामधून पुढे आलेल्या या काही गुन्ह्यांना बळी पडणे टाळण्यासाठी उपयुक्त ठरतील अशा सूचना:

आगाऊ शुल्क घोटाळा (अॅडव्हान्स्ड फी फ्रॉड) 

जेव्हा एखाद्या व्यक्तीला काही मूल्याच्या मोबदल्यात आगाऊ शुल्क भरण्यास सांगितले जाते पण आगाऊ शुल्क भरूनही सांगितलेले मूल्य मिळतच नाही, तेव्हा ती व्यक्ती आगाऊ शुल्क घोटाळ्याला बळी पडलेली असते.

हे टाळण्यासाठी सूचना 

  • काहीतरी प्राप्त करण्यासाठी तुम्हाला व्यक्तिगत किंवा ओळख उघड करणारी माहिती पाठवण्यास सांगणारा ईमेल आल्यास सावध राहा. 
  • स्वत:ला अधिकारी किंवा मानवतावादी कार्यकर्ते भासवून तुमच्याकडून पैशाच्या स्वरूपातील मदत मागणाऱ्या व्यक्तींबाबत सावध राहा.
  • एखाद्या 'बक्षिसा'साठी किंवा जे मोफत आहे असे दर्शवले जाते, त्यासाठी समोरून कोणत्याही प्रकारचे शुल्क भरू नका.

लिलाव घोटाळा

ईबेसारख्या ऑनलाइन लिलाव (ऑक्शन) घेणाऱ्या साइट्ससंदर्भात झालेल्या गैरव्यवहारांचे वर्गीकरण लिलाव घोटाळे असे केले जाते. 

हे टाळण्यासाठी सूचना 

  • वापरकर्त्यांनी दिलेल्या रेटिंग्जकडे लक्ष द्या. विक्रेते/खरेदीदार (ग्राहक) यांच्याबद्दल शक्य तेवढी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा.
  • सुपरिचित लिलाव सेवा निवडा आणि शक्य असेल तर क्रेडिट कार्डामार्फत किंवा पेपालसारख्या थर्ड पार्टी एस्क्रो सेवेमार्फत पैसे भरा.
  • व्यक्तिगत माहिती (उदारहणार्थ, सामाजिक सुरक्षा क्रमांक किंवा वाहन चालवण्याच्या परवान्याविषयी माहिती) विचारली गेल्यास सावध राहा.
  • अन्य साधनांद्वारे पैसे देण्याऐवजी वायर मनीचा पर्याय वापरण्यास सांगितले गेल्यास दक्षतेने व्यवहार करा.

कम्प्युटर गुन्हे

कम्युप्टर गुन्ह्यांची व्याख्या खालीलप्रमाणे केली जाते

(१) कम्प्युटर नेटवर्क्स किंवा उपकरणांना थेट लक्ष्य करून घडणारे गुन्हे

(२) कम्प्युटर्स नेटवर्क्स व उपकरणांच्या सहाय्याने केले जाणारे गुन्हे

हे टाळण्यासाठी सूचना 

  • उपलब्ध असलेल्यांपैकी सर्वांत अद्ययावत अँटि-व्हायरस मालवेअर संरक्षण घ्या आणि तुमच्या मशिनवरील सॉफ्टवेअर्स टप्प्याटप्प्याने व नियमितपणे अपडेट करता राहा.
  • तुमच्या ओळखीच्या नसलेल्या अॅडरेसेसवरून आलेल्या ईमेल्सना कधीही उत्तर देऊ नका तसेच संशयास्पद भासणाऱ्या अटॅचमेंट्स कधीही उघडून बघू नका.
  • तुमच्या हार्ड ड्राइव्हवरील काँटेण्ट्सचा बॅक-अप शक्य तेवढ्या वारंवारतेने घेत राहा.
  • रॅन्समवेअर्सची समस्या हाताळताना, गुन्हेगारांना कधीही पैसे देऊ नका.

क्रेडिट/डेबिट कार्ड घोटाळे 

क्रेडिट/डेबिट कार्ड घोटाळ्यांमध्ये पीडिताचे (व्हिक्टिम) क्रेडिट/डेबिट कार्ड वापरून अनधिकृतरित्या माल किंवा सेवांची शुल्के भरली जातात किंवा रोख पैसे काढले जातात. 

हे टाळण्यासाठी सूचना 

  • क्रेडिट कार्ड कंपनीत फोन करून चौकशी करा.
  • क्रेडिट किंवा डेबिट कार्डांची स्टेटमेंट्स मिळाल्यानंतर ती बारकाईने बघा. 
  • क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डाचे स्टेटमेंट वाचून झाले की त्याचे आठवणीने बारीक तुकडे करून टाका.
  • तुमचा पत्ता बदलला असेल किंवा तुम्ही बाहेरगावी जाणार असाल तर कार्ड जारीकर्त्याला तसे कळवा.
  • तुमच्यासाठी खात्रीची असलेली कंपनी वगळता अन्य कोणालाही फोनवरून तुमचा खातेक्रमांक कधीही सांगू नका.

आरोग्यसेवेशी निगडित घोटाळा

एखादी व्यक्ती आरोग्यसेवेशी निगडित किंवा आरोग्यविम्याशी संबंधित फसवणुकीला ऑनलाइन बळी पडली, तर या फसवणुकीला आरोग्यसेवेशी निगडित घोटाळा असे म्हटले जाते. 

हे टाळण्यासाठी सूचना 

  • अफोर्डेबल केअर अॅक्ट अर्थात परवडण्याजोगी आरोग्यसेवा कायद्याखालील मदत केवळ www.healthcare.gov या वेबसाइटवरून किंवा १-८००-३१८-२५९६ या क्रमांकावर फोन करून उपलब्ध करून घेता येते.
  • अफोर्डेबल केअर अॅक्टचे नाव सांगून तुम्हाला संपर्क करणाऱ्या कोणालाही तुमचे व्यक्तिगत तपशील कधीही देऊ नका.

अफोर्डेबल केअर घोटाळे टाळण्यासाठी सूचना

  • विमा दाव्याच्या कोऱ्या फॉर्म्सवर कधीही स्वाक्षरी करू नका.
  • घेतलेल्या सेवांचे बिल पाठवण्यासाठी कोणत्याही वैद्यकीय सेवा पुरवठादाराला संपूर्ण अधिकार देऊ नका.
  • वैद्यकीय उपकरणाची सेवा मोफत आहे असे सांगणाऱ्या दारोदार जाऊन किंवा टेलीफोनवरून व्यवसाय करणाऱ्या लोकांशी व्यवहार करू नका.

ओळख चौर्य (आयडेंटिटी थेफ्ट)

  • ओळख चौर्य किंवा आयडेंटिटी थेफ्ट म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिगत ओळख तपशिलांचा बेकायदा पद्धतीने वापर करणे होय.
  • तुमची व्यक्तिगत माहिती, विशेषत: तुमचा सामाजिक सुरक्षा क्रमांक, कायम जपून ठेवा.
  • फोनवरून व्यक्तिगत माहितीचे आदानप्रदान करताना तुम्ही नेमके कोणाशी बोलत आहात याची खात्री करून घ्या.
  • व्यक्तिगत माहितीचा अंतर्भाव असलेल्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तसेच कागदपत्रांची विल्हेवाट लावताना काळजी घ्या.
  • इनबॉक्समध्ये मेल्स फार काळ ठेवणे टाळा.
  • जटील स्वरूपाचे पासवर्ड निवडा व ते बदलत राहा.
  • अज्ञात स्रोतांकडून आलेल्या ईमेल्सबाबत दक्षता बाळगा.
  • सार्वजनिक वाय-फाय वापरताना सावध राहा. 
  • तुमच्या इलेक्ट्रॉनिक उपकरणांसाठी सिक्युरिटी सॉफ्टवेअर्सचा वापर करा.

रिअल इस्टेट घोटाळे 

रिअल इस्टेट घोटाळ्यांमध्ये, गुन्हेगार अस्तित्वात नसलेली किंवा स्वत:च्या मालकीची नसलेली मालमत्ता पीडितांना (व्हिक्टिम्स) विकतात किंवा भाड्याने देतात. 

हे टाळण्यासाठी सूचना 

  • कधीच वायरमार्फत पैसे पाठवू नका. हे रोख पैसे पाठवण्यासारखेच आहे.
  • बाजारभावाहून कमी दरांच्या भाडेप्रस्तावांबाबत सावधगिरी बाळगा.
  • घरमालकाला भेटण्यापूर्वी किंवा भाडेकरारावर स्वाक्षरी करण्यापूर्वी अनामत रक्कम किंवा पहिल्या महिन्याचे भाडे असे काहीही देऊन नका.
  • मालमत्तेचा मालक व्यवसायासाठी देशाबाहेर किंवा अन्यत्र गेला आहे असे सांगण्यात आल्यास सावधगिरी बाळगा.

रोमान्स घोटाळे

जेव्हा प्रेम किंवा प्रणयाचे वायदे करून पीडित व्यक्तींकडून पैसे किंवा अन्य मौल्यवान बाबी पाठवण्यास भाग पाडले जाते, तेव्हा या फसवणुकीला रोमान्स घोटाळा असे म्हटले जाते. 

हे टाळण्यासाठी सूचना 

  • ऑनलाइन मित्र/मैत्रिणींनी (प्रणयी नातेसंबंधांतील व्यक्तींनी) पैसे किंवा भौतिक मदतीची विनंती केल्यास हे नाते थांबवण्याची वेळ आली आहे असे समजा.
  • त्यांनी वापरलेले फोटो अन्य कोणत्या वेबसाइटवर वापरले आहेत का, हे तपासून बघा.
  • चुकीची स्पेलिंग्ज किंवा व्याकरणातील चुका यांवर लक्ष ठेवा.
  • व्यक्तिगत किंवा आर्थिक तपशिलांची विचारणा करणाऱ्या संदेशांना उत्तर देऊ नका.
  • धनादेश वटवण्यास किंवा वायरने पैसे परत पाठवण्यास नकार द्या.

वर्क-अॅट-होम घोटाळे

घरातून, आपल्याला जमेल तसे काम करून भरघोस उत्पन्न मिळवण्याची संधी देण्याच्या वायद्याखाली होणाऱ्या फसवणुकीच्या प्रकारांना वर्क-अॅट-होम घोटाळे असे म्हटले जाते. यातील प्रस्ताव बहुतेकदा खोटे असतात.  

हे टाळण्यासाठी सूचना 

  • कंपनीची वैधता निश्चित कऱण्यासाठी बेटर बिझनेस ब्युरोशी संपर्क करा.
  • सूचना किंवा उत्पादनांसाठी समोरून पैशाची मागणी होते तेव्हा संशय घेण्यास जागा आहे हे लक्षात घ्या.
  • तुमच्या संभाव्य एम्प्लॉयरशी प्रथम संवाद साधताना व्यक्तिगत माहिती देऊ नका.
  • ‘वर्क-अॅट-होम सोर्सबुक’ तसेच तुमच्या स्थानिक वाचनालयात उपलब्ध संसाधनांचा वापर करून वर्क-अॅट-होम संधींची अस्सलता पडताळण्यासाठी शोध घ्या.

 

तुमच्या घराची सुरक्षितता

१. अर्हताधारक/अनुभवी सुरक्षारक्षकांचीच (वॉचमन) नेमणूक करा. 

२. वॉचमेन/घरगुती मदतनिसांना कामावर ठेवण्यापूर्वी त्यांची पूर्वीची माहिती/ओळखपत्रे तपासून बघा. पूर्वीच्या मालकाकडून ओळखीचे पत्र आणण्याचा आग्रह धरा. त्यांचे सर्व तपशील तुमच्या जवळच्या पोलीसठाण्यात पोलिसांनी सांगितलेल्या नमुन्यामध्ये द्या.

३. दिवसाच्या व रात्रीच्या ड्युटीसाठी नेहमी वेगवेगळा वॉचमन ठेवा. 

४. सोसायटीच्या सचिवांनी सर्व सुरक्षाकर्मचारी/वॉचमेन/लिफ्टमेन यांना सुरक्षेच्या विविध अंगांची माहिती देणे अपेक्षित आहे. त्यातील काही पुढीलप्रमाणे:

  • फाटकाच्या आत किंवा एखाद्या इमारतीबाहेर टॅक्सी किंवा ऑटोरिक्षा खूप वेळ पार्क केलेली दिसल्यास त्याबद्दल चौकशी करणे
  • एखादे वाहन आवारात दीर्घकाळ पार्क केलेले आढळले आणि त्याचा मालक कोण हे समजले नाही तर पोलिसांना त्याची माहिती देणे.

५. सोसायटीच्या सचिवांनी सर्व रहिवाशांना खालील बाबींची माहिती देणे अपेक्षित आहे:

  • रहिवासी जेव्हा नवीन घरगुती मदतनीस ठेवतील, तेव्हा त्यांनी जवळच्या पोलीस ठाण्यात माहिती दिली पाहिजे. त्याचे/तिचे फोटो, बोटांचे ठसे आणि अन्य तपशील घेऊन स्थानिक पोलीस ठाण्यात सादर केले पाहिजेत.
  • रहिवाशांनी त्यांच्या फ्लॅटला लोखंडी गजांचा दरवाजा बसवून घेणे आवश्यक आहे. याशिवाय मुख्य दरवाज्याला श्रेष्ठ दर्जाचे नाइट लॅच व विशेष आय लेन्स असावी. आदर्श स्थितीमध्ये अनोळखी व्यक्ती किंवा विक्रेत्यांसोबतचा संवाद हा या लोखंडी दरवाज्याच्या आतूनच झाला पाहिजे. दाराबाहेर भरपूर प्रकाश देणारा लाइट व पिल्फर प्रूफ कव्हरही आवश्यक आहे. रहिवाशांनी घरात मोठी रोख रक्कम, किमती दागिने ठेवू नयेत.
  • घरगुती मदतनीस/बाहेरच्या व्यक्ती यांच्या उपस्थितीत पैशाचे व्यवहार किंवा अन्य महत्त्वाच्या कौटुंबिक मुद्दयांवर चर्चा करणे टाळावे. 
  • घरगुती मदतनिसांचा क्षुल्लक कारणांवरून अपमान करू नये किंवा छोट्या नुकसानीसाठी त्यांना शिक्षा देऊ नये.

६. कोणत्याही संशयास्पद घटनेबद्दल किंवा संशयास्पद परिस्थितीत सापडलेल्या बेवारस वस्तूबाबत पोलिसांना माहिती देणे महत्त्वाचे आहे. 

७. प्रत्येक सोसायटीत एक विशेष रजिस्टर असावे आणि ते वॉचमनकडे किंवा सोसायटीच्या कार्यालयात ठेवले जावे. जेव्हा पोलीस अधिकारी या भागात भेटीसाठी येतात, तेव्हा त्याची नोंद या रजिस्टरमध्ये करावी.  

कामाच्या ठिकाणी घ्यावयाची खबरदारी

१. कामाच्या ठिकाणी खबरदारी घेणे म्हणजे ज्ञात धोके स्वीकारार्ह स्तरावर आणण्यासाठी करण्याच्या कृती होय. खालील प्राधान्यक्रम अमलात आणल्यास कामाच्या ठिकाणी केलेल्या कोणत्याही कृतीमध्ये अत्यंत योग्य अशी सावधगिरी बाळगता येते:

  • शक्य असेल तर धोका पूर्णपणे टाळणे.
  • जेथे शक्य असेल तेथे धोक्याच्या मुळाशीच लढा देणे.
  • संपूर्ण कार्यस्थळाचे संरक्षण करणाऱ्या उपायांना प्राधान्य देणे.
  • जेथे शक्य असेल तेथे व्यक्तीपरत्वे कामाचे समायोजन करणे.
  • तंत्रज्ञानात्मक व तांत्रिक प्रगतीचा लाभ घेणे.
  • धोका किमान पातळीवर आणण्यासाठी अखेरचा पर्याय म्हणून व्यक्तिगत संरक्षक उपकरणांचा वापर करणे.

२. कार्यस्थळ खबरदाऱ्यांची विस्तृत श्रेणी उपलब्ध आहे, यातील काही उपाय अन्य उपायांहून अधिक प्रभावी आहेत. कार्यस्थळ प्रतिबंधात्मक उपायांमध्ये सामान्यपणे मशिनरी गार्ड्स, पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट्स (पीपीई) आणि कामाच्या सुरक्षित प्रणालींचा समावेश होतो. नियमित कामाच्या अनेक उपक्रमांमध्ये हे उपाय योग्य मार्गदर्शन करतात. काही धोक्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवणे केवळ योग्य त्या पद्धती अमलात आणल्यास किंवा कृतीसाठी अनुकूल प्रणालीला काम करण्याची परवानगी दिल्यास शक्य होऊ शकते. जेथे परमिट पद्धती वापरली जाते, तेथे तिचे पालन झालेच पाहिजे.

वाहनचोरी

भारतात दरवर्षी सुमारे ३६,००० वाहने  चोरीला जातात आणि त्यांचे मूल्य ११५ कोटी रुपयांच्या आसपास असते. यातील केवळ १४,५०० वाहनांचा शोध लागतो. सापडलेली वाहने बहुतेकदा न चालवण्याजोग्या स्थितीत असतात, त्यातील अनेक सुटे भाग नाहीसे झालेले असतात. ही वाहने चोरीला जातात, कारण, चोरांना वाहने चोरण्याची संधी अगदी सहज मिळते. अनेकदा कार्स पुरेशा सुरक्षेशिवाय तसेच कोणाचेही लक्ष नसलेल्या स्थितीत सोडल्या जातात. केवळ अँटि-थेफ्ट उपकरणे कारमध्ये स्थापित केली तरी गाडीचोराचे प्रयत्न फोल ठरू शकतात. रात्रीच्या वेळी सुरक्षित पार्किंग आस्थापनात (गॅरेज, पेट्रोलपंप आदी) गाडी पार्क केल्यास तिचे चोरांपासून संरक्षण होते. जर पार्किंग सुविधा उपलब्ध नसेल, तर उत्तम प्रकाश असलेल्या ठिकाणी गाडी पार्क करावी. गाडीचा क्रमांक विंडस्क्रीन्स तसेच खिडक्यांच्या काचांवरही कोरून घेणे उत्तम ठरेल. त्यामुळे शोध घेणाऱ्या यंत्रणांना तुमची गाडी शोधणे सोपे होईल. 

तुम्ही काय केले पाहिजे?

  • स्टीअरिंग लॉक, क्लच लॉक, ब्रेक लॉक आदी संरक्षक उपकरणांचा वापर करा.
  • बूटसह सर्व दारे पुन्हापुन्हा तपासत राहा. 
  • शक्य असेल तर तुमच्या कारमध्ये मोठ्या आवाजाची इशारा यंत्रणा बसवून घ्या. जेणेकरून चोरांनी तुमची गाडी फोडून त्यात प्रवेश केला तरी ती चोरणे त्यांच्यासाठी कठीण होईल.
  • शक्य असेल तर गाडीत डिटॅचेबल म्युझिक सिस्टम बसवून घ्या आणि दीर्घकाळ गाडी पार्क करायची असल्यास म्युझिक सिस्टम काढून स्वत:सोबत ठेवा. जेणेकरून, गाडीतील महागड्या वस्तू बघून ती चोरण्याचा मोह चोरांना होणार नाही.
  • नंबरप्लेटशिवाय गाडीच्या पुढील व मागील भागावरही गाडीचा क्रमांक रंगवून घ्या. विंडस्क्रीन्स व खिडक्यांच्या काचांवरही तो कोरून घेतलात तर फारच उत्तम. त्यामुळे बनावट नंबरप्लेट वापरून तुमच्या गाडीचा गैरवापर करण्याच्या प्रयत्नांना आळा बसेल.

तुम्ही काय टाळले पाहिजे?

  • गाडीची दारे कधीच उघडी टाकू नका, खिडक्या अर्धवट उघड्या टाकू नका. क्वार्टर ग्लासेस संरक्षित आहेत याची खात्री करून घ्या.
  • गाडीमध्ये अतिरेकी फिटिंग्ज करून घेऊ नका, त्यामुळे गाडीचोरांना ती चोरण्याचा मोह अधिक होतो.
  • किल्ली इग्निशनमध्ये लटकत कधीच ठेवू नका.
  • तुमची गाडी चोरीला गेल्यास त्वरित जवळच्या पोलीसठाण्यात कळवा.
  • तुमच्या विमा कंपनीला कळवा.
मालमत्ता खरेदी

सामान्य जनतेला सीओ, ओपी, एचएसजी, सोसायटी आदींबद्दल तसेच फ्लॅट खरेदी करताना फसवणूक कशी टाळावी याबद्दल सूचना

जमिनीच्या मालकीची पडताळणी

  • विकासकाला एनओसी प्राप्त झाली आहे आणि जमीन अकृषी (नॉन-अॅग्रिकल्चर) आहे याची खातरजमा सिटी सर्व्हे ऑफिसमधून करून घ्या. 
  • मालकीहक्क स्पष्ट आहे हे तपासण्यासाठी तलाठी किंवा तहसीलदार कार्यालयातून सातबारा काढून घ्या.
  • वादातील किंवा कायदेशीर खटल्यातील जमिनीसाठी बेलिफ किंवा उच्च न्यायालयातील आर्बिट्रेटरशी संपर्क साधा. 

विविध यंत्रणांकडून एनओसी

बांधकामाची वैधता तपासण्यासाठी

१. प्रारंभ प्रमाणपत्र (कमेन्समेंट सर्टिफिकेट) किंवा पालिका यंत्रणेने दिलेले नामंजुरीचे पत्र तपासणे

२. बिल्डर/विकासकाशी खालील कारणांसाठी संपर्क साधणे

  • आर्किटेक्टने सादर केलेले आराखडे
  • जमीन मालकीहक्क स्पष्टतेसाठी वृत्तपत्रात दिलेली नोटिस
  • सॉलिसिटरचे प्रमाणपत्र
  • बांधकाम निवासी आहे की व्यावसायिक याची खात्री करून घेणे
  • बिल्डरला मंजूर झालेला आणि त्याने वापरलेला एफएसआय
  • सरकारी सदनिका किंवा अन्य विषेश प्रवर्गासाठी केलेल्या आरक्षणाची टक्केवारी
  • नागरी कमाल भूधारणा आरक्षणाखाली जमीन येत आहे की नाही हे तपासणे
बँकिंग करताना घेण्याची दक्षता
  • तुमच्या बँकेत खाते उघडण्याच्या हेतूने कधीही अनोळखी माणसाला ओळख (रेफरन्स) देऊ नका.
  • अनोळखी व्यक्तीचे धनादेश/ड्राफ्ट्स कधीही तुमच्या खात्यावर वटवू नका.
  • तुमचे खाते दीर्घकाळ निष्क्रिय ठेवू नका.
  • टपाल प्रेषण किंवा कुरियस सेवेतील चोऱ्या टाळण्यासाठी टपाल तसेच कुरियरमार्फत पाठवण्यात आलेले धनादेश/ड्राफ्ट्स/पे ऑर्डर्स यांच्यावर बारीक लक्ष ठेवा.
  • शक्यतो आपले बँक व्यवहार आपणच करा.
  • तुमच्या चेकबुकची काळजी घ्या. सही केलेले धनादेश ड्रॉवरमध्ये किंवा सहज सापडतील अशा ठिकाणी कधीच ठेवू नका.
  • जमा केलेले धनादेश वटले आहेत याची खात्री करण्यासाठी सर्व बँक व्यवहारांची पुन्हापुन्हा पडताळणी करा.
  • तुमच्या बँकखात्याची मासिक स्टेटमेंट्स न चुकता तपासा.
  • रोख रक्कम काढताना खातेधारकाने स्वत: रक्कम मोजून घ्यावी. कधीही तिसऱ्या माणसाला रोकड मोजण्यासाठी देऊ नये.

चेक बाउन्स होणे टाळण्यासाठी

  • तुम्ही अपरिचितांसोबत व्यवहार करत असाल तर डीडी किंवा पे ऑर्डरचा आग्रह धरा.
  • पुढील तारखेचे (पोस्टडेटेड) धनादेश घेणे टाळा.
  • चेक बाउन्स झाला, तर तुम्ही संबंधित व्यक्तीला १५ दिवसांच्या आत त्याबद्दल नोटिस दिली पाहिजे. या नोटिशीला उत्तर आले नाही, तर न्यायालयात निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स अॅक्ट, १९८१च्या कलम १३८ खाली तक्रार दाखल करावी. यामध्ये जनतेसाठी प्रभावी उपाय उपलब्ध आहेत. चेक बाउन्स होण्याची सर्व प्रकरणे भारतीय दंड संहितेखाली फसवणुकीचे गुन्हे असतीलच असे नाही.