अभिप्राय / तक्रार फॉर्म
ठळक बातम्या
English
ठळक बातम्या
२५-मार्च-२०१७
अक्सिस बँकेने केवळ पोलीस कर्मचाऱ्यांसाठी एक टोल-फ्री बँकिंग हेल्पलाइन सुरू केली आहे. ही हेल्पलाइन इंग्रजी, हिंदी आणि मराठी या भाषांमध्ये उपलब्ध आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील पोलीस महासंचालक सतीश माथुर (आयपीएस) यांनी अक्सिस बँकेच्या ब्रांच बँकिंग विभागाचे अध्यक्ष व प्रमुख संजय सिलास यांच्यासह हेल्पलाइनचे उद्घाटन केले.
१७-जुलै-२०१७
हिंजवडी, येरवडा, खराडी आणि हडपसर येथील आयटी पॉकेट्समध्ये बडी कॉप या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्णपणे कार्यान्वित झाला आहे. १०,००० पोलीस कर्मचाऱ्यांच्या विशाल दलातील प्रत्येकावर १५० स्त्रियांची जबाबदारी सोपवली जाणार आहे. शहरातील स्त्रियांना वाचवण्यासाठी टाकलेले प्रत्येक पाऊल हे विकासाच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे. महिला कर्मचाऱ्यांना बडी कॉप्सचे संपर्क क्रमांक दिले जातील. हे बडी कॉर्स शक्यतो पोलीस कर्मचारी असतील आणि सुरक्षिततेशी निगडित सर्व बाबींवर त्या पोलिसांशी चर्चा करू शकतील.
०१-जानेवारी-२०१७
"स्त्रिया व लहान मुले यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी भरोसा सेल स्थापन करणे ही काळाची गरज आहे. हा विभाग स्त्रिया व लहान मुलांना मानसशास्त्रीय तसेच कायदेशीर सहाय्य पुरवणार आहे. गुन्हेगारांद्वारे माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढत असल्यामुळे समाजातील गुन्हे व हिसांचाराचे स्वरूप बदलत आहे. गुन्हेगारांना कायद्याची भीती वाटणे गरजेचे आहे. या बदलत्या परिस्थितीत पोलीस खात्यानेही त्यांच्या कामकाजात माहिती तंत्रज्ञानाचा वापर करणे आवश्यक आहे,” असे मुख्यमंत्री म्हणाले.